मनीष सिसोदिया म्हणाले- सूरत (पूर्व) येथील आमची उमेदवार कांचन जरीवाला यांना नुकतेच रिटर्निंग ऑफिसरच्या कार्यालयात आणण्यात आले आहे. आता उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आपचे उमेदवार पोहोचले
गुजरात आज राजकीय नाट्य सुरू आहे. आम आदमी पार्टी ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इशुदान गढवी यांनी दावा केला आहे की, भाजपने सुरत पूर्व येथील ‘आप’च्या उमेदवार कांचन जरीवाला यांचे अपहरण केले आहे. आता कांचन जरीवाला यांनी अर्ज मागे घेण्यासाठी रिटर्निंग ऑफिसरचे कार्यालय गाठले आहे. भाजप कांचन जरीवाला यांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप आपने केला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी कांचन जरीवाला यांना 500 हून अधिक पोलिसांनी घेरल्याचा आरोप केला आहे.
आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, “गुंड आणि पोलिसांच्या आधारे उमेदवारांचे अपहरण केले जात आहे आणि त्यांचे अर्ज परत केले जात आहेत. सार्वजनिक गुंडगिरीचा हा प्रकार भारतात कधीच दिसला नाही मग निवडणुकांचा अर्थ काय? मग लोकशाही संपली.
पहा पोलीस आणि भाजपचे गुंड कसे एकत्र आहेत – आमच्या सुरत पूर्व उमेदवार कांचन जरीवाला यांना RO ऑफिसमध्ये ओढले, त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले
मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका हा शब्द विनोद बनला आहे! pic.twitter.com/CY32TrUZx8
— राघव चढ्ढा (@raghav_chadha) १६ नोव्हेंबर २०२२
आप नेते मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “गुजरातमधील सुरत (पूर्व) येथील आमचे उमेदवार कांचन जरीवाला यांना नुकतेच रिटर्निंग ऑफिसरच्या कार्यालयात आणण्यात आले आहे. त्यांना 500 हून अधिक पोलिसांनी घेरले होते आणि आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आपचा दावा – भाजपकडून धमक्या येत होत्या
याआधी इशुदान गढवी आणि ज्येष्ठ आप नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी दावा केला होता की जरीवाला आणि त्यांच्या कुटुंबीयांचे भाजपने अपहरण केले होते.जरीवाला यांनी 14 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 15 नोव्हेंबर रोजी भाजपने त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा प्रयत्न केल्याचा आपचा दावा आहे. कांचन जरीवाल यांच्या कुटुंबीयांना सतत धमक्या येत असल्याचं आप नेत्यांनी सांगितलं आहे.
भाजपचा प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून उदयास येण्याचा ‘आप’चा प्रयत्न
गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपचा प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून उदयास येण्याच्या प्रयत्नात असलेल्या आम आदमी पक्षाने निवडणुकीत पूर्ण ताकद लावली आहे.पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला 89 जागांवर तर 5 डिसेंबरला 93 जागांवर मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात होईल. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
,
Discussion about this post